उत्तर प्रदेशात गर्भवती महिलेला तोंडी तलाक

Thursday, 21 September 2017

मीरत: सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाक घटनाबाह्य ठरवल्यानंतर काही तासांतच एका गर्भवती महिलेला अशा

मीरत: सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाक घटनाबाह्य ठरवल्यानंतर काही तासांतच एका गर्भवती महिलेला अशा प्रकारे तलाक दिल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. येथील मोहल्ला कमरा नवाबन येथील एका गर्भवती महिलेला तिच्या पतीने तोंडी तलाक दिला आहे.

याबाबत संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हुंड्यासाठी मला पतीने बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

या महिलेचा विवाह सहा वर्षांपूर्वी झाला असून, तिला तीन अपत्ये आहेत. पतीच्या मारहाणीत गर्भपात झाल्याचेही या महिलेने म्हटले आहे.

संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी मंगळवारी तिच्या सासू - सासऱ्यांची भेट घेतली. मात्र, पतीने या महिलेला तीनदा तलाक असा शब्द उच्चारून तलाक दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या घरच्यांनी त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली. मात्र, हा निर्णय मानण्यास त्याने नकार दिला.

पोलिस अधीक्षक धर्मेंद्र सिंह म्हणाले,""ही तलाक पूर्ण अवैध आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतरही जे तोंडी तलाक देत आहेत त्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा द्यायची, हा मुद्दा आता या घटनेमुळे पुढे आल्याचे "ऑल इंडिया मुस्लिम वूमन पर्सनल लॉ बोर्ड'ने म्हटले आहे. बोर्डाच्या अध्यक्षा शाहिस्ता अंबेर म्हणाल्या, ""हा न्यायालयाचा अवमान आहे. अशा प्रकरणांत शिक्षेची तरतूद करावी यासाठी बोर्ड सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. या प्रकरणी न्यायालय व सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे; अन्यथा महिलांवर अन्याय सुरूच राहील.''

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News